खरावतेकर लिखित " डॉ. आंबेडकर" ह्या बाबासाहेबांवरील पाहिल्या चरित्राबद्दल माहिती !
जय भीम ! बाबासाहेबांबद्दल सध्या वाचलेल "डॉ. आंबेडकर" हे पुस्तक, ह्या पुस्तकाचं वैशिष्ट्य असे की, हे त्यांच्यावरील पहिले चरित्र असल्याचं लेखकाने म्हटलं आहे. जरुर असं असणार कारण ह्या पुस्तकाची पहिली आवृत्ती सन १९४६ मध्ये छापली गेली, म्हणजे बाबासाहेब हयात असताना. त्या काळात आणखी कोणी चरित्र लिहिल्याचे आढळून येत नाही. तानाजी बाळाजी खरावतेकर हे ह्या पुस्तकाचे लेखक ते मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील खरावते या गावचे,तानाजी बाळाजी खरावतेकर हे बाबासाहेबांनंतर कोकणातील पहिले पदवीधर ! ६०-६२ पानांचं हे पुस्तक बाबासाहेबांबद्दल बरीचशी माहिती देऊन जातं, जसं की, १) बाबासाहेबांचा जन्म कुठे झाला, मग पुढे त्यांचं कुठे कुठे वास्तव्य राहिले. म्हणजे महू मध्ये त्यांचा जन्म झाला इथपासून ते मुंबई पर्यंत ते कसे आले त्यात मध्यंतरी ते कुठे होते हे ही वाचनात येते २) बाबासाहेबांचं अभ्यासप्रेम किती अपार ह्या बद्दल खूप छान माहिती आहे, नवीनच मला कळलं की बाबासाहेब रात्री १० च्या सुमारास झोपत असतं पण रात्री १ वाजता उठून अभ्यासाला बसत आणि नंतर सकाळी फक्त थोडी झोप घेत आणि शाळेत जात असतं ( तुम्हा...