डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ' दि बुद्धा ॲण्ड हिज धम्मा ' या ग्रंथातील अप्रकाशित प्रस्तावना !

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ' दि बुद्धा ॲण्ड हिज धम्मा ' या ग्रंथातील अप्रकाशित प्रस्तावना !


पुढील माहिती ही बाबासाहेबांनी लिहिलेल्या ' बुद्ध आणि त्यांचा धम्म ' ह्या ग्रंथाच्या विनिमय पब्लिकेशन्सने मराठीत अनुवाद केलेल्या पुस्तकातून घेतली आहे.


            डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली मूळ प्रस्तावना कोणीही प्रकाशित केलेल्या ' बुद्ध आणि त्यांचा धम्म' या ग्रंथात छापली नाही. ती मूळ प्रस्तावना वाचकांना विनिमय पब्लिकेशन्स प्रकाशित केलेल्या ग्रंथात वाचायला मिळेल.

            ' बुद्ध आणि त्यांचा धम्म ' या ग्रंथाची छपाईची संपूर्ण जबाबदारी  मुंबईला पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे मुख्य ग्रंथपाल मा. एस. एस. रेगे यांच्याकडे सोपवली होती.
त्यासंबंधीचा बराच पत्रव्यवहार उपलब्ध आहे. या ग्रंथाची प्रस्तावना बाबासाहेबांनी आधीच लिहिली होती. ५ डिसेंबर १९५६ ला त्यांनी तिच्यावर शेवटचा हात फिरवला.
            " डॉ. भदन्त आनंद कौसल्यायान यांनी देखील एका मुलाखतीत असा उल्लेख केला आहे की, ६ डिसेंबर ते अंतिम दर्शनाला आले तेव्हा डॉ. आंबेडकरांनी दुरुस्त केलेल्या प्रस्तावनेची शाई देखील वाळलेली नव्हती. या प्रस्तावनेची प्रत सोसायटीला कागदपत्रे दिली तेव्हा त्या कागदपत्रांबरोबर आली असून आजही ती पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या ताब्यात आहे. तसेच टंकलिखित जादा प्रत रट्टूंच्याही संग्रही आहे." ( धर्मांतर ते महापरिनिर्वाण, पी. व्ही. सुखदेवे, पृ. १९८ ) भगवान दास यांनी मूळ प्रस्तावना प्रसिद्ध केली होती. तसेच एल. आर. बाली यांनी देखील Rare prefaces written by Dr. Ambedkar ही पुस्तिका प्रकाशित केली होती. पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे या समितीचे मुख्य सदस्य सचिव वसंत मून यांनी देखील प्रकाशित केली होती.
Buddha and his Dhamma book | बुद्ध आणि त्यांचा धम्म पुस्तक
Buddha and His Dhamma


                        PREFACE


            A question is always asked to me, how I happen to take such high degree of education. Another question is being asked why I am inclined towards Buddhism. These questions are asked, because I was born in the community, known in India, as the 'Untouchables'. This preface is not the place for answering the first question. But this preface may be the place for answering the second question.
            The direct answer to this question is that, I regard the Buddha's Dhamma to be the best. No religion can be compared to it. If a modern man, who knows science must have a religion, the only religion he can have is the Religion of the Buddha. This conviction has grown in me, after thirty-five years of close study of all religions.
            How I was led to study Buddhism is another story. It may be interesting for the readers to know. This is how it happened.
            My father was a military officer, but at the same time a very religious person. He brought me up under a strict discipline. From my early age, I found certain contradictions in my father's religious way of life. He was a Kabirpanthi, thought his father was  Ramanandi . As such, he did not believe in Murti Puja ( Idol Worship ) and yet he performed Ganpati puja. Of course, for our sake but I did not like it. He read the books of his Panth. At the same time, he compelled me and my elder brother to read every day, before going to bed a portion of Mahabharat and Ramayana to my sisters and other persons, who assembled at my father's house to hear the Katha. This went on for a long number of years.
            The year I passed the English Forth Standard Examination, my Community people wanted to celebrate the occasion by holding a public meeting to congratulate me. Compared to the state of education in other Communities, this was hardly an occasion for celebration. But it was felt by the organizers that, as I was the first boy in my Community to reach this stage, they thought that I had reached a great height. They went to my father to ask for his permission. My father fatly refused saying, such a thing would infate boy. After all, he has only passed an examination and done nothing more. Those who wanted to celebrate the event were greatly disappointed. They, however, did not give way. They went to Dada Keluskar, a personal friend of my father, and asked him to intervene. He agreed. After a little argumentation, my father yieled and the meeting was held. Dada Keluskar presided. He was a a literary person of his time. At the end of his address he gave me, as a gift, a copy of his book on the life of the Buddha, which he had written for the Baroda Sayajirao Oriental Series. I read the book with great interest and was greatly impressed and moved by it.
             I began to ask, why my father did not introduce us to the Buddhist Literature. After this, I was determined to ask my father this question. One day I did. I asked my father why he insisted upon our reading the Mahabharata and Ramayana, which recounted the greatness of the Brahmins and the Kshatriyas and repeated the stories of the degradation of the Shudras and the Untouchables. My father did not like the question. He merely said, " You must not ask such silly questions. You are only boys, you must do as you are told." My father was a Roman Patriarch and exercised most extensive Patria Protestas over his children. I alone could take a little liberty with him and that was because my mother had died in my childhood leaving me to the care of my aunti.
           So after some time, I asked again the same question. This time my father had evidently prepared himself for a reply. He said, " The reason why I ask you to read the Mahabharata and Ramayana is this: We belong to the Untouchables and you are likely to develop an inferiority complex, which is natural. The value of Mahabharata and Ramayana lies in removing this inferiority complex. See Drona and Karna, they were small men, but to what heights they rose ! Look at Valmiki he was a Koli, but he became the author of Ramayana. It is for removing this inferiority complex that I ask you to read the Mahabharata and Ramayana."
           I could see that there was some force in my father's argument. But I was not satisfied. I told my father that I did not like any of the figures in Mahabharata. I said, "I do not like Bhishma, and Drona nor Krishna. Bhishma and Drona were hyprocrites. They said one thing and did quite the opposite. Krishna believed in frauds. His life is nothing but a series of frauds. Equal dislike I have for Rama. Examine his conduct in the Sarupnakha episode, in the Vali Sugriva episode and his beastly behaviour towards Sita. My father was silent and made no reply. He knew that there was a revolt.
           This is how I turned to the Buddha, with the help of the book given to me by Dada Keluskar. It was not with an empty mind that I went to the Buddha at that early age. I had a background and in reading the Buddhist Lore, I could always compare and contrast. This is the origin of my interest in the Buddha and his Dhamma.
           The urge to write this book has a different origin. In 1951, the Editor of the Mahabodhi Society's Journal of Calcutta asked me to write an article for the Vaishak number. In that article, I argued that Buddha's Religion was the only religion, which a society awakened by science could accept and without which it would perish. I also pointed out that for the modern world Buddhism was the only religion, which it must have to save itself. That Buddhism makes slow advance is due to the fact that its literature is so vast that no one can read the whole of it. That it has no such thing as a Bible, as the Christians have, is its greatest handicap. On the publication of this article, I recieved many calls written and oral to write such a book. It is in response to these call that I have undertaken the task.
           To disarm all criticism, I would like to make it clear that I claim no originality for the book. It is a compilation and assembly plant. The material has been gathered from various books. I would particularly like to mention " Ashavaghosha's Buddhavita" whose poetry no one can excel. In the narrative of certain events, I have borrowed his language.
           The only originality that I can claim is, the order of presentation of the topics, in which, I have tried to introduce simplicity and clarity. There are certain matters, which give headache to the student of Buddhism, I have dealt with them in the introduction.
           It remains for me to express my gratitude to those, who have been helpful to me. I am very grateful to Mr. Nanak Chand Rattu of village Sakrulli and Mr. Parkash Chand of village Nangal Khurd in the district of Hoshiarpur ( Punjab ) for the burden they have taken upon themselves to type out the manuscript. They have been done it several times. Shri Nanak Chand Rattu took special pains and put in very hard labour in accomplishing this great task. He did the whole work of typing etc. very willingly and without caring for his health and any sort of remuneration. Both Mr. Nanak Chand Rattu and Mr. Parkash Chand did their job, as a token of their greatest love and affection towards me. Their labour can hardly be repaid. I am very much grateful to them.
           When I took up the task of composing the book, I was ill and am still ill. During these five years, there were many ups and downs in my health. At some stages my condition had become so critical that doctors talked of me, as a dying fame. The successful rekindling of this dying fame is due to the medical skill of my wife and Dr. Malvankar, the Physician, who has been attending me. I am immensly grateful to them. They alone have helped me to complete the work.
           I may mention that this is one of the three books, which will form a set for the proper understanding of Buddhism. The other two books are, ( 1 ) Buddha and Karl Marx, and ( 2 ) Revolution and counter revolution in ancient India. They are written out in parts. I hope to publish them soon.

26 Alipur Road, Delhi
6th April, 1956                

                                          B. R. Ambedkar


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची अप्रकाशित प्रस्तावना ' दि बुद्धा ॲण्ड हिज धम्मा ' या इंग्रजी ग्रंथाच्या प्रस्तावनेचा मराठी अनुवाद


           मी इतके उच्च शिक्षण कसे घेतले असा प्रश्न मला नेहमी विचारला जातो. माझा बुद्ध धर्माकडे का कल आहे असाही प्रश्न मला विचारला जात आहे. भारतात ' अस्पृश्य ' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समाजात माझा जन्म झाला म्हणून मला हे प्रश्न विचारले जातात. पहिल्या प्रश्नाचे उत्तर देण्याची उपोद्घात ही जागा नाही. मात्र दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर या उपोद्घातात‌ देता येईल.
           बुद्धाचा धम्म हा जगात सर्वोत्कृष्ट आहे असे मी मानतो, हे या प्रश्नाचे सरळ उत्तर आहे. दुसऱ्या कोणत्याही धर्माची त्याच्याशी तुलना होऊ शकत नाही. विज्ञानाची माहिती असलेल्या कोणत्याही आधुनिक माणसास धर्माची आवश्यकता वाटली, तर केवळ बुद्धाच्या धर्माचाच त्याला स्वीकार करावा लागेल. सर्व धर्माचा पस्तीस वर्षे सूक्ष्म अभ्यास केल्यानंतर माझी अशी खात्री झाली आहे.
           बौद्ध धर्माकडे मी कसा वळलो याची वेगळी कहाणी आहे. ती जाणून घेणे वाचकांस कदाचित आवडेल. घडले ते असे.
           माझे वडील सैन्यात अधिकारी होते. ते अत्यंत धार्मिक होते. त्यांनी मला कडक शिस्तीत वाढवले. माझ्या वडिलांच्या धार्मिक जीवनपद्धतीत मला लहान असल्यापासूनच काही अंतर्विरोध आढळले. त्यांचे वडील ( माझे आजोबा ) रामा नंदांच्या पंथाचे असले तरी माझे वडील कबीरपंथी होते. त्यामुळे मूर्ती पूजेवर त्यांचा विश्वास नव्हता. तरीही ते आमच्यासाठी गणपतीची पूजा करीत असत. मात्र मला त्यांनी तसे करणे आवडत नसे. आपल्या पंथाची पुस्तके ते वाचीत असत. त्याच वेळी दररोज झोपायला जाण्यापूर्वी ते मला आणि माझ्या मोठ्या भावाला वडिलांच्या घरी कथा ऐकण्यासाठी जमलेल्या माझ्या बहिणींना आणि इतर माणसांना महाभारत व रामायण यातील काही भाग वाचून दाखवावयास लावीत असत. हा उपक्रम अनेक वर्षे चालू राहिला.
           ज्या वर्षी मी इंग्रजी चौथ्या इयत्तेची परीक्षा उत्तीर्ण झालो त्यावर्षी माझ्या अभिनंदनाची एक सभा भरवून परीक्षेतील माझे यश साजरे करण्याची माझ्या समाजातील लोकांची इच्छा होती. इतर समाजातील शिक्षणाच्या स्थितीशी तुलना केल्यास हा प्रसंग समारंभ साजरा करण्यासारखा नव्हता. पण माझ्या समाजात इतकी मजल मारणारा मी पहिलाच मुलगा आहे आणि मी उच्च स्थान मिळवले आहे, असे सभेच्या आयोजकांना वाटत होते. परवानगी मागण्यासाठी ते माझ्या वडिलांकडे गेले. तेव्हा माझ्या वडिलांनी त्यांना सरळ नकार दिला. असा काही समारंभ केला तर मिळालेले यश मुलाच्या डोक्यात जाईल असे ते म्हणाले. मुलाने परीक्षा पास करण्याखेरीज अधिक काहीही केलेले नाही असे ते म्हणाल्यामुळे समारंभ साजरा करण्याची इच्छा असलेल्यांची फार निराशा झाली. मात्र त्यांनी नाद सोडला नाही. दादा केळुसकर ( कृ. अ. केळुसकर ) माझ्या वडिलांचे मित्र होते. संयोजक त्यांना भेटले. वडिलांचे मन वळवण्यास दादा तयार झाले. त्यांनी थोडा युक्तिवाद केल्यावर वडिलांनी परवानगी दिली आणि दादा केळूसकरांच्या अध्यक्षतेखाली सभा भरली. दादा त्या काळातील एक साहित्यिक होते. आपल्या समारोपाच्या भाषणाच्या अखेरीस दादांनी मला बुद्धाच्या जीवनविषयीचे एक पुस्तक बक्षीस दिले. बडोद्याच्या सयाजीराव महाराजांच्या ग्रंथमालेसाठी त्यांनी ते लिहिले होते. अतिशय आवडीने ते पुस्तक मी वाचले. त्याचा माझ्यावर फार प्रभाव पडला आणि त्यामुळे माझे मन हेलावले.
           बौद्ध साहित्याची माझ्या वडिलांनी आम्हाला का ओळख करून दिली नाही असे मी माझ्या मनाला विचारू लागलो. त्यानंतर हा प्रश्न वडिलांनाच विचारण्याचा मी निश्चय केला आणि एके दिवशी तो विचारलाही.‌ ब्राह्मण आणि क्षत्रिय यांची महती सांगणाऱ्या आणि शूद्रांच्या व अस्पृश्यांच्या अवनतीच्या कथा पुनः पुन्हा सांगणाऱ्या महाभारत व रामायण या ग्रंथांचे वाचन आम्ही करावे असा ते का आग्रह धरतात असे मी वडिलांना विचारले. माझ्या वडिलांना हा प्रश्न आवडला नाही. " असले वेड्यासारखे प्रश्न तू विचारू नकोस. तुम्ही लहान मुले आहात. तुम्हाला जसे वडीलधारी माणसे सांगतात तसेच तुम्ही वागले पाहिजे, " एवढेच ते म्हणाले. रोममधल्या कुटुंबातील कर्ता पुरुष जसा सर्वाधिकारी म्हणून हुकूमत गाजवतो तशीच सत्ता आपल्या मुलांवर माझे वडील गाजवीत असत. माझी आई माझ्या बालपणीच माझ्या आत्याच्या ओटीत मला देऊन दिवंगत झालेले असल्यामुळे मीच एकटा वडिलांबरोबर बोलताना थोडेसे स्वातंत्र्य घेत असे. म्हणूनच काही दिवसांनी मी त्यांना तोच प्रश्न विचारला. यावेळी मात्र माझ्या प्रश्नाला उत्तर देण्याची माझ्या वडिलांनी तयारी केली होती. असे स्पष्ट दिसले. ते म्हणाले, " महाभारत व रामायण वाच असे मी तुला सांगितले त्याचे हे कारण आहे. आपण अस्पृश्य आहोत. त्यामुळे तुझ्या मनात न्यूनगंड निर्माण होण्याची सहाजिकच शक्यता आहे. महाभारत आणि रामायण हा न्यूनगंड दूर करील. द्रोणाकडे आणि कर्णाकडे पहा. ती सामान्य माणसे होती. पण केवढ्या उच्च पदावर पोचली ? वाल्मिकीकडे बघ. तो कोळी होता. पण त्याने रामायण लिहिले. तुझ्या मनातील न्यूनगंड नाहीसा व्हावा म्हणून मी तुला महाभारत आणि रामायण वाच असे सांगितले. " माझ्या वडिलांच्या युक्तिवादात काही तथ्य होते, ते मला जाणवले. पण त्या उत्तराने माझे समाधान झाले नाही. महाभारतातील कोणीही मला आवडत नाही, असे मी वडिलांना सांगितले. मी म्हणालो, " मला भीष्म, द्रोण, कृष्ण कोणीही आवडत नाही. भिष्म आणि द्रोण हे ढोंगी होते. ते जे म्हणत असत त्याच्याबरोबर विरुद्ध त्यांचे वागणे असे. कृष्णाचा कपाटावर विश्वास असल्यामुळे त्याचे सारे आयुष्य म्हणजे नुसती कपटमालिका आहे. रामही मला तितकाच अप्रिय आहे. शूर्पणखेचे प्रकरण असो, वाली-सुग्रीव संघर्षाचा प्रसंग असो किंवा सीतेशी त्याने केलेले पाशवी वर्तन असो. या सर्व प्रसंगीचे रामाचे वागणे तपासून पहा. " यावर काही उत्तर न देता माझे वडील गप्प बसले. मुलाने बंड पुकारले आहे, हे त्यांना समजले.
          अशा तऱ्हेने मी दादा केळूसकरांनी बक्षीस दिलेल्या पुस्तकाच्या मदतीने बुद्धाकडे वळलो. त्या लहान वयात रिकाम्या मनाने मी बुद्धाकडे वळलो नव्हतो. त्याला एक पार्श्वभूमी होती. बौद्ध वाङ् मय वाचताना मी नेहमीच तुलना करीत होतो. ' बुद्ध आणि त्याचा धम्म ' याबद्दल मला वाटणाऱ्या आस्थेचा उगम असा झाला आहे.
          हा ग्रंथ लिहिण्यामागच्या प्रेरणेचे उगमस्थान मात्र वेगळेच आहे. १९५१ साली कलकत्त्याच्या महाबोधी सोसायटीच्या नियतकालिकाच्या संपादकांनी वैशाख विशेषांकासाठी लेख लिहिण्याबद्दल माझ्याकडे विचारणा केली. ' वैज्ञानिक जागृती झालेल्या समाजाला स्वीकारार्ह वाटावा असा बुद्धाचा धर्म हा एकमेव धर्म आहे आणि त्याचा स्वीकार त्या समाजाने केला नाही तर विनाश ओढवेल ' असे त्या विशेषांकातील लेखात मी प्रतिपादन केले होते. आधुनिक जगाला वाचावावयाचे असेल तर केवळ बुद्धाच्या धर्माचाच स्वीकार करावा लागेल असेही मी त्यात दाखवले होते. बौद्धांचे वाङ् मय इतके प्रचंड आहे की ते सर्व वाचणे कोणासही शक्य होत नाही. या सत्यस्थितीमुळे बौद्ध धर्माचा विकास फार मंद गतीने होत आहे. ख्रिस्ती लोकांकडे जसे बायबल आहे तसे काहीही बौद्धांकडे नाही, ही फार मोठी उणीव आहे. हा लेख प्रसिद्ध झाल्यावर मला अनेकांनी असा ग्रंथ लिहिण्याबद्दल तोंडी तशीच लेखी विनंती केली. त्यांना प्रतिसाद द्यावा म्हणून मी हे ग्रंथ लेखनाचे काम हाती घेतले.
          सर्व टीकाकारांना आधीच निःशस्त्र करावे म्हणून मी या पुस्तकात स्वतंत्र असे काहीच नसल्याचे स्पष्ट करीत आहे. हे केवळ एक संकलन आहे. विविध ग्रंथांतून त्यातील साहित्य मी गोळा केले आहे. विशेषतः अश्वघोषाच्या बुद्धचरिताचा मी उल्लेख करीत आहे. त्यापेक्षा सरस काव्य कोणासही करता येणार नाही. काही घटनांचे निवेदन करताना मी अश्वघोषाच्या भाषेची उसनवारी केली आहे.
या ग्रंथातील विषयांची क्रमवार मांडणी करताना मी साधेपणा व स्पष्टता साधली आहे, असा माझा दावा आहे. तेवढीच माझी मूलगामी स्वतंत्र निर्मिती आहे. बौद्ध धर्माच्या अभ्यासकांच्या डोकेदुखीस कारण ठरलेल्या काही बाबी आहेत त्यांची चर्चा मी प्रस्तावनेत केली आहे.
          ज्यांनी मला साहाय्य केले त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे एवढेच उरले आहे. होशियारपूर जिल्ह्यातील नानगल खुर्दचे प्रकाशचंद आणि सकरौली गावचे नानकचंद रत्तू यांनी हस्तलिखितांचे टंकलेखन करण्याचा बोजा उचलला याबद्दल मी त्यांचा अत्यंत ऋणी आहे. त्यांनी असे काम बऱ्याचदा केले आहे. नानकचंद रत्तूंनी फार कष्ट घेतले आहेत. हे मोठे काम पुरे करण्यासाठी त्यांनी अपार परिश्रम केले आहेत. त्यांनी टंकलेखनाचे काम खुषीने केले आहे. ते करताना स्वतःच्या प्रकृतीची फिकीर केली नाही तसेच कसल्याही मानधनाची अपेक्षा त्यांनी बाळगली नाही. माझ्याबद्दलच्या निरातिशय प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे प्रतीक म्हणून नानकचंद रत्तू आणि प्रकाशचंद या दोघांनी काम केले. त्यांच्या श्रमांचे चीज करणे कठीण आहे. मी त्यांचा अत्यंत ऋणी आहे.
          या ग्रंथाची रचना करण्याचे काम मी हाती घेतले तेव्हा मी आजारी होतो. अद्यापही मी आजारीच आहे. या पाच वर्षात माझ्या प्रकृतीत बरेच चढ-उतार झाले. काही वेळा माझी प्रकृती इतकी चिंताजनक झाली होती की, मी एखादी विझणारी ज्योत असल्यासारखे डॉक्टर माझ्याबद्दल बोलत असत. हि विझत चाललेली ज्योत पुन्हा पेटली ती माझी पत्नी व डॉ. मालवणकर यांच्या वैद्यकीय कौशल्यामुळे. हे लेखनाचे काम पुरे करण्यात मला केवळ त्यांनीच मदत केली आहे.
          बौद्ध धर्माचे यथायोग्य आकलन होण्यासाठी मी जे तीन ग्रंथ लिहिणार आहे त्यापैकी हा एक ग्रंथ आहे, असे मी नमूद करीत आहे. अन्य दोन ग्रंथ आहेत ते खालीलप्रमाणे : १) बुद्ध अॅण्ड कार्ल मार्क्स आणि २) रेवोल्युशन अॅण्ड काऊंटर रेवोल्युशन इन एन्शंट इंडिया. त्यांचे काही भाग मी लिहिले आहेत. हे दोन ग्रंथही लवकरच प्रकाशित होतील अशी मला आशा आहे.

२६ अलीपूर रस्ता, दिल्ली,
६ एप्रिल १९५६
                                    बी. आर. आंबेडकर


टीप :  विनिमय पब्लिकेशन्स प्रकाशित पुस्तकात पुढील वाक्य मराठी अनुवादात लिहिले आहे पण हे वाक्य इंग्रजी प्रस्तावनेत आढळतात नाही, " मुद्रिते दुरुस्त करण्यात रस घेतल्याबद्दल तसेच सबंध ग्रंथ वाचल्याबद्दल मी श्री. म. भि. चिटणीस यांचा आभारी आहे. "

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Trisaran-Panchshil and it's Marathi meaning | त्रिसरण पंचशील व मराठी अर्थ

Jaymangal And It's Marathi meaning | जयमंङ्गल अठ्ठगाथा व मराठी अर्थ

Bhim Stuti | भीम स्तुती व मराठी अर्थ