डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ' दि बुद्धा ॲण्ड हिज धम्मा ' या ग्रंथातील अप्रकाशित प्रस्तावना !
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ' दि बुद्धा ॲण्ड हिज धम्मा ' या ग्रंथातील अप्रकाशित प्रस्तावना ! पुढील माहिती ही बाबासाहेबांनी लिहिलेल्या ' बुद्ध आणि त्यांचा धम्म ' ह्या ग्रंथाच्या विनिमय पब्लिकेशन्सने मराठीत अनुवाद केलेल्या पुस्तकातून घेतली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली मूळ प्रस्तावना कोणीही प्रकाशित केलेल्या ' बुद्ध आणि त्यांचा धम्म' या ग्रंथात छापली नाही. ती मूळ प्रस्तावना वाचकांना विनिमय पब्लिकेशन्स प्रकाशित केलेल्या ग्रंथात वाचायला मिळेल. ' बुद्ध आणि त्यांचा धम्म ' या ग्रंथाची छपाईची संपूर्ण जबाबदारी मुंबईला पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे मुख्य ग्रंथपाल मा. एस. एस. रेगे यांच्याकडे सोपवली होती. त्यासंबंधीचा बराच पत्रव्यवहार उपलब्ध आहे. या ग्रंथाची प्रस्तावना बाबासाहेबांनी आधीच लिहिली होती. ५ डिसेंबर १९५६ ला त्यांनी तिच्यावर शेवटचा हात फिरवला. " डॉ. भदन्त आनंद कौसल्यायान यांनी देखील एका मुलाखतीत असा उल्लेख केला आहे की, ६ डिसेंबर ते अंतिम दर्श...