Sangh Vandana and it's Marathi meaning | संघ वंदना व मराठी अर्थ
संघ वंदना
सुपटिपन्नो भगवतो सावकसंघो, उजुपटिपन्नो भगवतो सावकसंघो, ञायपटिपन्नो भगवतो सावकसंघो,सामीचिपटिपन्नो भगवतो सावकसंघो,यदिदं चत्तारि पुरिसयुगानी, अट्ठ पुरिस पुग्गला-एस भगवतो सावकसंघो,आहुनेय्यो पाहुनेय्यो दक्खिणेय्यो, अञ्जलि-करणीयो, अनुत्तरं पुञ्ञं क्खेतं लोकस्सा ति|संंघं जीवितं परियंतं सरणं गच्छामि||१||ये च संघा अतीता च, ये च संघा अनागता| पच्चुपन्ना च ये संघा, अहं वन्दामि सब्बदा||२||
नत्थि में सरणं अञ्ञं,संघो मे सरणं वरं|एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलं||३||
उत्तमङ्गेन वन्दे हं संघञ्च तिविधोत्तमं|संघे यो खलितो दोसो, संघो खमतु तं ममं||४||
यं किञ्चि रतनं लोके, विज्जति विविधा पुथु|रतनं बुद्धसमं नत्थि, तस्मा सोत्थि भवन्तु मे|५|||
संङ्घो विसुद्धो वरदक्खिणेय्यो|सन्तिद्रियो सब्बमलप्पहिनो|गुणेहि नेकेहि समिद्धिपत्तो|अनासवो तं पणमामि संघ||६||
मराठी अर्थ
भगवंताचा शिष्यसंह सन्मार्गावर आरुढ आहे.भगवंताचा शिष्यसंघ सरळ मार्गावर आरुढ आहे.
भगवंताचा शिष्यसंघ ज्ञानाच्या मार्गावर आरुढ आहे.
भगवंताचा शिष्यसंह उत्तम मार्गावर आरुढ आहे.
भगवंताचा शिष्यसंघ अश्या नररत्नांचा आहे की, ज्यांना वरील चारी जोड्या व आठ सप्तपदांची प्राप्ती करून घेतली आहे. हा संघ म्हणजे निमंत्रण देण्यास योग्य, स्वागत करण्यास योग्य, दान देण्यास योग्य आणि जगात सर्वश्रेष्ठ पवित्र क्षेत्रा समान आहे. असा हा संघ वंदनक करण्यासयोग्य आहे.अशा या संघाला मी जिवंत असेपर्यंत अनुसरतो.||१||
जे भिक्खु संघ होऊन गेले ते,जे भिक्खु संघ हल्ली आहेत
ते आणि जे भिक्खु संघ होणार आहेत,त्या सर्वांना मी सदासर्वदा वंदन करतो/करते.||२||
मला दुसरे कोणतेही सरण स्थान नाही, बुद्धांचा शिष्यसंघच
माझे सर्वश्रेष्ठ सरण स्थान आहे.या सत्यवचनाने माझे जयमंगल होवो.||३||
तिन्ही प्रकारांनी श्रेष्ठ असलेल्या या संघाला नतमस्तक
होऊन वंदन करतो/करते. संघसंबंधी जर माझ्याकडून
काही दोष घडला असेल, तर मला त्याबद्दल क्षमा असो.||४||
या जगात जी निरनिराळी अनेक रत्न आहेत,त्यापैकी एकानेही संघाची बरोबरी होणार नाही. या सत्य सत्यवचनाने
माझे कल्याण होवो.||५||
संघ विशुध्द,दान देण्यास योग्य,शांत इंद्रियांचा,सर्व
प्रकार मलांपासून दोषांपासून अलिप्त ,अनेक
गुणांनी युक्त,तसाच निष्कलंक आहे. अशा या संघाला
मी प्रणाम करतो/ प्रणाम करते.||६||
Comments
Post a Comment