Punyanamodan and it's Marathi meaning(पुण्यनमोदन व अर्थ)
पुण्यनुमोदन
दुक्प्पखत्ता च निदुक्खा भयप्पत्ता च निब्भया |सोकप्पत्त च निस्सोको होन्तु सब्बेपि पाणिनो||१ ||
एतावता च अम्हेहि सम्भतं पुञ्ञ सम्पदं|
सब्बे देवानुमोदन्तु सब्ब सम्पति सिध्दिया ||२||
दानं ददन्तु सध्दाय सीलं रक्खन्तु सब्बदा |
भावना भिरता होन्तु गच्छन्तु देवतांगता ||३||
सब्बे बुध्दा बलपत्ता पच्चकानञ्च यं बलं |
अरहन्ताञ्च तेजेन, रक्खन्तु बन्धामि सब्बसो ||४||
आकासठ्ठा च भूम्मठा, देवा- नागा महिध्दिका |
पुञ्ञं तं अनुमोदित्वा, चिरं रक्खन्तु सासनं ||५||
आकासठ्ठा च भूम्मठा, देवा- नागा महिध्दिका |
पुञ्ञं तं अनुमोदित्वा, चिरं रक्खन्तु देसनं ||६||
आकासठ्ठा च भूम्मठा, देवा- नागा महिंध्दिका |
पुञ्ञं तं अनुमोदित्वा, चिरं रक्खन्तु त्वं परन्ति ||७||
मराठी अर्थ
समस्त दुखी प्राणी दु:खरहित,भयग्रस्भत प्राणी भयरहित
आणि शोकग्रस्त प्रणी शोकरहित होवोत.||१||
हे जे आम्ही कुशल कर्म केलेले आहे. सर्वसज्जन त्याला
अनुमोदन देवोत, त्यामुळे सर्व संपत्तीची वृद्धी होवो.||२||
श्रध्देने दान देण्यांत येवो. शिलांचे पालन केले जावो.
भावना संपादन करण्यात येवो, आणि निर्वाण गती मिळो.||३||
सर्व बल प्राप्त बुद्धांच्या आणि आर्हंतांच्या प्रतापाने आपले
सर्व प्रकारे रक्षण होवो आणि सर्वांना बलं प्राप्त.||४||
आकाशात आणि भूमीवर राहणाऱ्या महाप्रतापी देवलोक
आणि नागलोक ह्या कुशल कर्माचे अनुमोदन करून चिरकलापर्यंत बुद्ध शासन आपले रक्षण करो.||५||
आकाशांत आणि भूमीवर राहणाऱ्या महाप्रतापी देवलोक
आणि नागलोक ह्या पुण्याचे अनुमोदन करून
चीरकलापर्यंत धम्मोपदेश आपले रक्षण करो.||६||
आकाशात आणि भूमीवर राहणाऱ्या महाप्रतापी देवलोक
आणि नागलोक ह्या पुण्याचे अनुमोदन करून चीरकलापर्यंत
तुमचे रक्षण करो.||७||
Comments
Post a Comment