Parabhav sutta and it's Marathi meaning | पराभव सुत्त व मराठी अर्थ
पराभव सुत्त
एवं मे सुतं |
एकं समयं भगवा सवात्थियं विहरित जेतवने अनाथ पिण्डिकस्स आरामे |
अथ खो अञ्ञतरा देवता अभिक्कन्ताय रत्तिया अभिकन्तवण्णा केवलकप्पं जेतवनं ओभासेत्वा |
येन भगवा तेनुपङकमि, उपसङकत्मित्तवा भगवंन्त अभिवादेत्वा एकमन्तं आठ्ठासि |
एकमन्तं ठ्ठिता खोसा देवता भगवन्त गाथाय अज्झाभासि |
पराभवन्त पुरिसं मयं पुच्छाम गोतमं|
भगवन्तं पुट्ठमागम्म, किं पराभवतो मुखं||१||
सुविज्जानो भवं होति, सुविजानो पराभवो|
धम्मकामो भवं होति, धम्मोदस्सो पराभवो||२||
इति हेतं विजानाम, पठमो सो पराभवो|
दुतियं भगवा ब्रुही, किं पराभवो मुखं||३||
असन्तस्स पिसा होन्ति, सनते न कुरुते पियं|
असतं धम्म रोचेति, तं पराभवतो मुखं||४||
इति हेतं विजानाम, दुतियो सो पराभवो|
तितयं भगवा ब्रुहि, किं पराभवतो मुखं||५||
निद्दासिली सभासिली अनुठ्ठता च यो नरो|
अलसोपञ्ञाणो, तं पराभवतो मुखं||६||
इति हेतं विजानाम, ततियो सो पराभवो|
चतुत्थं भगवा ब्रुहि, किं पराभवतो मुखं||७||
यो मातरं वा पितरं वा जिण्णकं गतयोब्बन|
पहु सन्ते न भरति, तं पराभवतो मुखं||८||
इति हेतं विजानाम, चतुत्थो सो पराभवो|
पञ्चम भगवा ब्रुहि, किं पराभवतो मुखं||९||
यो ब्राम्हणं वा समणं वा ञ्ञ वा पि वनिब्बकं|
मुसावादेन पञ्चेति, तं पराभवतो मुखं||१०||
इति हेतं विजानाम, पञ्चमो सो पराभवो|
छठ्ठंम भगवा ब्रुहि, किं पराभवतो मुखं||११||
पहूतवित्तो पुरिसो सहिरज्जो सभोजनो|
एको भुञ्ञति सादूनि, तं पराभवतो मुखं||१२||
इति हेतं विजानाम, छठ्ठमो सो पराभवो|
सत्तमं भगवा ब्रुहि, किं पराभवतो मुखं||१३||
जातित्थध्दो धनत्थध्दो गोत्तत्थध्दो च यो नरो|
सञ्ञाति अतिमञ्ञेति, कि पराभवतो मुखं||१४||
इति हेतं विजानाम, सत्तमो सो पराभवो|
अठ्ठम भगवा ब्रुहि, किं पराभवतो मुखं||१५||
इत्थिधुत्तो सुराधुत्तो, अक्खधुत्तो च यो नरो|
लध्दं लध्दं विनासेति, तं पराभवतो मुखं||१६||
इति हेतं विजानाम, अठ्ठमो सो पराभवो|
नवमं भगवा ब्रहि, किं पराभवतो मुखं||१७||
सेहि दारेहि असंतुट्टो वेसियासु पदिस्सति|
दिस्सति परदारे सु, तं पराभवतो मुखं||१८||
इति हेतं विजानाम नवमो सो पराभवो|
दसमं भगवा ब्रुहि, किं पराभवतो मुखं||१९||
अतीतयोब्बनो पोसो आनेति तिम्बरुत्थनिं |
तस्सा इस्सा न सुपति, तं पराभवतो मुखं ||२०||
इति हेतं विजानामं, दससो सो पराभवो |
एकादसमं भगवा ब्रुहि, कीं पराभवतो मुखं ||२१||
इत्थिं सोण्डिं विकिरणिं पुरीसं वापि तादिसं |
इस्ससरियम्मि ठापेति, तं पराभवतो मुखं ||२२||
इति हेतं विजानामं, एकादसमो सो पराभवो |
व्दादसमं भगवा ब्रुहि, किं पराभवतो मुखं ||२३||
अप्पभोगो महातंडःॊ खत्तिये जायते कुले |
सोध रज्जं पत्थयति, तं पराभवतो मुखं ||२४||
एते पराभवो लोके पण्डितो समवेक्खियं
आरियो दस्सनसम्पन्न स लोकं जिवंति ||२५||
मराठी अर्थ
पराभव सुत्त अर्थअसे मी ऐकले आहे की, एके वेळी भगवान श्रावस्ती येथे जेतवनांत अनाथपिण्डिकाच्या संघारामात राहत होतें तेव्हा रात्र संपत आली असता एक सज्जन व्यक्ती सर्व जेतवन प्रकाशित करुन भगवंताजवळ आली व भगवताला नमस्कार करुन एका बाजूला उभी राहिली बाजूला उभी राहून ती व्यक्ती भगवंताला पद्यात म्हणाली-
आम्ही भगवान गौतमाला विचारण्यासाठी आलो आहोत की पराभव पावणारा पुरुष कोणता हे विचारतो| पराभवाचे कारण काय||१||
भगवान बुद्ध म्हणाले, वृध्दिंगत होणारा पुरुष सहज जाणता येतो व पराभव पावणारा पुरुष ही सहज जाणता येतो. वृध्दिंगत होणारा पुरुष धम्म पारंगत असतो व पराभव पावणारा पुरुष धम्माचा द्वेष करणारा असतो ||२||
भगवान हा पहिला पराभव समजला, दुसरे पराभवाचे कारण कोणते ते सांगा||३||
ज्याला दुर्जन आवडतात, सज्जनांविषयी प्रेम नसते. त्याला दुर्जानाचा धर्म रुजतो, हे त्याच्या पराभवाचे दुसरे कारण होय||४||
भगवान हा दुसरा पराभव समजला, तिसरे पराभवाचे कारण कोणते ते सांगा||५||
जो मनुष्य निद्राशिल, सभाप्रिय, प्रत्यय न करणारा, आळशी असतो आणि क्रोधिष्ट होतो, हे त्याच्या पराभवाचे तिसरे कारण होय||६||
भगवान हा तिसरा पराभव समजला, चौथे पराभवाचे कारण कोणते ते सांगा||७||
जो समर्थ असून वयोवृद्ध आईवडिलांचा सांभाळ करीत नाही, त्यांची सेवा करत नाही, हे त्याच्या पराभवाचे कारण होय||८||
भगवान हा चौथा पराभव समजला,पाचवे पराभवाचे कारण कोणते ते सांगा||९||
जो ब्राम्हणाला, श्रमणाला किंवा दुसर्या गरीब मनुष्याला खोटे बोलून ठकवतो, हे त्याच्या पराभवाचे कारण होय||१०||
भगवान हा पाचवा पराभव समजला, सहावे पराभवाचे कारण कोणते ते सांगा||११||
पुष्कळ धन संपत्ती आणि अन्न-धान्य असलेला मनुष्य गोड गोड पदार्थ एकटाच खातो, हे त्साच्या पराभवाचे कारण होय||१२||
भगवान हा सहावा पराभव समजला, सातवे पराभवाचे कारण कोणते ते सांगा||१३||
जाती, धन आणि गोत्र यांचा गर्व बाळगणारा जो मनुष्य आपल्या आप्तांची अवहेलना करतो, हे त्याच्या पराभवाचे कारण होय||१४||
भगवान हा सातवा पराभव समजला, आठवे पराभवाचे कारण कोणते ते सांगा||१५||
स्त्री, मद्यपान आणि जुगार या व्यसनात जो पुरुष मिळवलेली संपत्ती पुन्हा पुन्हा घालवितो, हे त्याच्या पराभवाचे कारण होय||१६||
भगवान हा आठवा पराभव समजला, नववे पराभवाचे कारण कोणते ते सांगा||१७||
स्वस्त्रीने संतुष्ट न होता,जो पुरुष वेश्यांशी आणि परस्त्रियांशी संबंध ठेवतो, हे त्याच्या पराभवाचे कारण होय||१८||
भगवान हा नववा पराभव समजला, दहावे पराभवाचे कारण कोणते ते सांगा||१९||
जो पुरुष वयस्कर असूनही तरुण स्त्री सोबत लग्न करतो व तिच्या ईर्षेने शांत झोपत नाही, हे त्याच्या पराभवाचे कारण होय||२०||
भगवान हा दहावा पराभव समजला,अकरावे पराभवाचे कारण कोणते ते सांगा||२१||
जो मनुष्य दुर्व्यसनी आणि उधळ्या स्त्री ला किंवा पुरुषाला अधिकाराच्या जागेवर नेमतो, हे त्याच्या पराभवाचे कारण होय||२२||
भगवान हा अकरावा पराभव समजला, बारावे पराभवाचे कारण कोणते ते सांगा||२३||
ज्या कुळात जन्मला त्याचे भान विसरुन, जो मनुष्य अवास्तव हाव धरतो व मोठी राज्यसत्ता मिळवू पाहतो, हे त्याच्या पराभवाचे कारण होय||२४||
जो सुज्ञ व तत्वज्ञान संपन्न श्रेष्ठ व्यक्ती,ही पराभवाची बारा कारणे जाणून, आपले जीवन जगतो, तो जीवनात यशस्वी होतो ||२५||
Comments
Post a Comment