Narsinha Gatha and it's Marathi meaning | नरसिंह गाथा व अर्थ

Narsinha Gatha | Buddha Rituals | Buddhism

                 नरसिंह गाथा


चक्कवरकिङत रत्तसुपादो, लक्खण मण्डित आयतपण्ही,
चामर छत्त विभूसित पादो, एस हि तूय्ह पिता नरसिंहो||१||
साक्यकुमार वरो सुकुमालो, लक्खणचिंत्तित पुण्यसरीरो,
लोकहिताय गतो नरवीरो, एस हि तूय्ह पिता नरसिंहो||२||
पुण्यसंसड निभुमुखवण्णो, देवनरनापियो नरनागो,
मंत्तगाजिन्द विलासितगमि, एस हि तूय्ह पिता नरसिंहो||३||
खांयि सम्भव अग्ग कुलीनो देव मनुस्स नमास्मित पादो,
शील समाधि पतिठ्ठितचित्तो एस हि तूय्ह पिता नरसिंहो||४||
आयततुङग सुसंठीत नासो, गोपमुखो अभिनील सुनेतो|
इद्रधनु अभिनील भमूको,एस हि तूय्ह पिता नरसिंहो||५||
वठ्ठ सुमठ्ठ सुसंठीत गीवो, सिंहहुन मिगराज सरीरो,
कच्चन सुच्छवि उत्कमवण्णो, एस हि तूय्ह पिता नरसिंहो||६||
सिनिद्ध, सुगंम्भीर ञ्ञसुधोसो, हिंगलब्धु सुरतसुजिव्हो विसती|
वीसती सेतसुन्दतो, एस हि तू हे पिता नरसिंहो||७||
ञ्ञन वण्ण सुनील सुकेसो, कंच्चनपट्ट विसुद्ध ललाटो|
ओसधी पण्डर सुद्धसुउण्णो, एस हि तूय्ह पिता नरसिंहो||८||
गच्छंती नील पंथे विंव चन्दो, तारांगण परीवेटृिटत रुपो|
सावकम्ज्झ गतो समणिन्द्रो, एस हि तूय्ह पिता नरसिंहो||९||

                       मराठी अर्थ


ज्यांचे चरण रक्त वर्ण चक्राने अलंकृत आहेत, ज्यांच्या पावलांच्या टाचा सुंदर आहेत, ज्यांचे पावलं चामर - छत्राने सुशोभित आहेत. ते जे नरात सिंह आहेत, तेच तुझे पिता आहेत||१||
ते जे सुकुमार शाक्य कुमार आहेत जे सुंदर चिन्हानी परिपूर्ण संपूर्ण शरीर संपन्न आहेत. ज्याने लोकांच्या हितासाठी गृह त्याग केला ते जे सुकुमार शाक्य कुमार आहेत जे सुन्दर चिन्हानी परीपुर्ण सम्पुर्ण शरीर सम्पन्न आहेत, तेच तुझे पिता आहेत ||२||
ज्यांचे मुखमंडळ पुर्ण चन्द्रा प्रमाणे प्रकाशमान आहे. देव मनुष्यनाग गणांना प्रिय आहे. ते जे मस्त गजेन्द्र प्रमाणे जात आहे. नरात सिंह आहेत, तेच तुझे पिता आहेत||३||
ते जे सर्वश्रेष्ठ क्षत्रिय कुळात जन्म पावलेले असून ज्यांच्या चरणांची देवमनुष्य वंदना करतात, ज्यांचे शील - समाधीने सुप्रतिष्टीत झाले आहे. ते जे नरात सिंह आहेत, तेच तुझे पिता आहेत||४||
ज्यांची नासीका विस्तीर्ण आणि सरळ आहे. ज्यांचे नेत्र नील वर्णाचे आहेत, ज्यांच्या भुवया इंद्रधनुष्याच्या कमानीप्रमाणे आहेत. ते जे नरात सिंह आहेत, तेच तुझे पिता आहेत||५||
ज्यांचा चेहरा गोलाकार .ज्यांती हनुवटी सिंहाप्रमाणे व शरीर हरिणीप्रमाणे आहे, ज्यांचा रंग सुवर्णा प्रमाणे आकर्षक आहे.ते जे नरात सिंह आहेत, तेच तुझे पिता आहेत.||६||
ज्यांची स्निग्ध आहे,गंभीर आहे, मधुर आहे, ज्यांची जिव्हा सेंदुराप्रमाणे रक्तवर्णाची आहे, ज्यांच्या मुखात पांढरे शुभ्र असे सोळा-सोळा बत्तिस दात आहेत, ते जे नरात सिंह आहेत, तेच तुझे पिता आहेत.||७||
ज्यांचे केस काळेभोर, डोळे निळे, कपाळ सोन्यासारखे तेजोमय आहे, ज्यांची काया औषधी तार्याप्रमाणे शुभ्र सुशोभित आहे. ते जे नरात सिंह आहेत, तेच तुझे पिता आहेत||८||
तारांगणात, चंद्रासमान, भिक्षुगणात शोभुन दिसणारे, आपल्या श्रावकां समावेत जात आहेत, ते जे नरात सिंह आहेत, तेच तुझे पिता आहेत||९||

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Trisaran-Panchshil and it's Marathi meaning | त्रिसरण पंचशील व मराठी अर्थ

Jaymangal And It's Marathi meaning | जयमंङ्गल अठ्ठगाथा व मराठी अर्थ

Bhim Stuti | भीम स्तुती व मराठी अर्थ