Mahamangal Sutta and it's Marathi meaning|महामंङ्गल सुत्त व अर्थ
महामङ्गल सुत्त
एवं मे सुतं |एकं समयं भगवा सवात्थियं विहरित जेतवने अनाथ पिण्डिकस्स आरामे |अथ खो अञ्ञतरा देवता अभिक्कन्ताय रत्तिया अभिकन्तवण्णा केवलकप्पं जेतवनं ओभासेत्वा |
येन भगवा तेनुपङकमि, उपसङकत्मित्तवा भगवंन्त अभिवादेत्वा एकमन्तं आठ्ठासि |
एकमन्तं ठ्ठिता खोसा देवता भगवन्त गाथाय अज्झाभासि:-
बहू देवा मनुस्सा च, मग्ङलानि अचिन्तयुं |
आकङखमाना सोत्थानं,ब्रुंहि मग्डलमुत्तमं||१||
असवेनाच बालनं, पण्डितानञ्च सेवना|
पूजा चं पूजानियानं,एतं मग्ङलमुत्तमं||२||
पति रुप देसवासे च,पुब्बे च कतपुञ्ञता |
अत्सम्पापणिधि च,एतं मग्ङलमुत्तमं||३||
बाहुसच्च ञ सिपच्च विनञयो च सुसिक्खितो |
सुभासितो च या वाचा,एतं मग्ङलमुत्तमं||४||
माता पितु उपठ्ठानं,पुत्तदारस्स सग्ङहो |
अनाकुला च कम्मन्ता,कम्मन्ता, एतं मग्ङलमुत्तमं||५||
दानं च धम्मचरया च,ञातकानं च सग्ङहो |
अनवज्जनि कम्मानि, एतं मग्ङलमुत्तमं||६||
आरती विरती पापा,मज्जपाना च संयमो |
अप्पमादो च धम्मेसु, एतं मग्ङलमुत्तमं||७||
गारवो च निवातो च सन्तठ्ठी च कञ्ञुता |
कालेन धम्मवणं एतं मग्ङलमुत्तमं||८||
खन्ति च सोवचसाकच्छा,समणानं च दस्सनं|
कालेन धम्मसाकच्छा,एतं मंग्ङलमुत्तमं||९||
तपो च ब्रम्हचरिच्च, अरियसच्चान दस्सनं |
निब्बानसाच्छिकिरिया च, एतं मग्ङलमुत्तमं||१०||
फुठ्ठस्स लोकधम्मोहि, चित्तं यस्स न कम्पति |
असोकं विरजं खेमं, एतं मग्ङलमुत्तमं||११||
एतादिसानि कत्वान, सब्बत्थं अमपराजिता |
सब्बत्थ, सोत्थि गच्छन्ति, एतं मग्ङलमुत्तमं ति||१२||
मराठी अर्थ
असे मी ऐकले आहे की, एके वेळी भगवान श्रावस्ती येथे जेतवनांत अनाथपिण्डिकाच्या संघारामात राहत होतें तेव्हा रात्र संपत आली असता एक सज्जन व्यक्ती सर्व जेतवन प्रकाशित करुन भगवंताजवळ आली व भगवंताला नमस्कार करुन एका बाजूला उभी राहिली बाजूला उभी राहून ती सत्पुरुष भगवंताला म्हणाली, स्वतःचे कल्याण इच्छिणार्या पुष्कळ देवांनी आणि माणसांनी मंगलाविषयी विचार केला , तेव्हा उत्तम मंगल कोणते ते आपण सांगावे||१||
मूर्खाची संगती न करणे, शहाण्या माणसांची संगत करणे व पूज्य लोकांची पूजा करणे हे उत्तम मंगल होय||२||
अनुकूल स्थळी वास करणे, शुभ गोष्टी संपादन करणे व आपल्याला सन्मार्गावर लावणे हे उत्तम मंगल होय||३||
अंगी बहुश्रुतपणा असणे, कला संपादन करणे, अंगी शिष्ठता बाळगणे व सुभाषण करणे हे उत्तम मंगल होय||४||
आई वडिलांची सेवा करणे, मुलबाळ, बायको यांचे सांभाळ करणे व उलाढाली न करणे हे उत्तम मंगल होय||५||
दान देणे, धम्मचरण, आप्तेष्टांचा आदरसत्कार करणे, पापकर्मा पासून अलिप्त राहणे हे उत्तम मंगल होय||६||
काया,वाचा व मनाने अशुभ न करणे, मद्यपान न करणे आणि धम्म कार्यात तत्पर राहणे हे उत्तम मंगल होय||७||
गौरव करणे, नम्रता करणे, संतुष्ट राहणे, केलेले उपकार स्मरणे आणि योग्य वेळी धम्म श्रवण करणे हे उत्तम मंगल होय||८||
क्षमाशील असणे, अंगी लीनता असणे, सज्जनांचे दर्शन घेणे आणि योग्य वेळी धम्म चर्चा करणे हे उत्तम मंगल होय||९||
तप, ब्रम्हचर्याचे पालन , आर्य सत्याचे दर्शन आणि निर्वाणाचा साक्षात्कार हे उत्तम मंगल होय||१०||
ज्यांचे मन लोक धम्माने विचलित होत नाही जो निःशोक, निर्मल आणि निर्भय राहतो हे उत्तम मंगल होय||११||
येणेप्रमाणे कार्य करुन सर्वत्र अपराजित राहून लोककल्याणाला प्राप्त करितात हे त्यांच्या करिता(श्रेष्ठ पुरुष व मनुष्याकरिता) उत्तम मंगल होय||१२||
Comments
Post a Comment