Mahamangal Gatha and it's Marathi meaning | महामंङ्गल अठ्ठगाथा व अर्थ

Mahamangal Gatha | Buddhism | Buddha

महामङगल गाथा 


महाकारुणीतको नाथो दिताय सब्बपाणिनं|
पूरत्वा पारमी सब्बा पत्तोसम्बोधि-मुत्तमं|
एतेन सच्चवज्जेन होतु ते जयमङ्गल||१||
जयन्तो बोधियो मूले सक्यानं नन्दिवड् ढनो|
एवं तुय्हं जयो होतु जयस्सु जयमङ्गल||२||
सक्कत्वा बुद्धरतनं ओसधं उत्तमं वरं, 
हितं देव मनुस्सानं बुद्धतेजेन सोत्थिना|
नस्सन्तुपद्दवा सब्बे दुक्खा वूपसमेन्तु ते||३||
सक्कत्वा धम्मरतंनं ओसधं उत्तमं वरं, 
परिमलाहुपसमनं धम्मतेजेन सोत्थिना|
नस्सन्तु पद्दवा सब्बे भया वूपसमेन्तू ते||४||
सक्कत्वा संघरतंनं ओसधं उत्तमं वरं,
आहुण्णेयं पाहुणेय्यं संघतेजेन सोत्थिना|
नस्सन्तु पद्दवा सब्बे रोगा वूपसमेन्तु ते||५||
यं किञ्चि रतनं लोके विज्जतति विविधं पुथु,
रतनं बुद्ध समं नत्थि. तस्मा सोत्थि भवन्तु ते||६||
यं किञ्चि रतनं लोके विज्जति विविधं पुथु,
रतनं धम्म समं नत्थि तस्मा सोत्थि भवन्तु ते||७||
यं किञ्चि रतनं लोके विज्जति विविध पुथु,
रतनं संघं समं नत्थि तस्मा सोत्थि भवन्तु ते||८||
नत्थि मे सरणं अञ्ञं बुद्धो मे सरणं वरं,
एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमंगलं||९||
नत्थि मे सरणं अञ्ञं धम्मो मे सरणं वरं,
एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमंगलं||१०||
नत्थि मे सरणं अञ्ञं संघो मे सरणं वरं,
एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमंगलं||११||
सब्बीतियो विवज्जन्तु सब्बरोगो विनास्सन्तु,
मा ते भवत्वन्तरायो सुखी दीघायुको भव||१२||
भवतु सब्ब मंग्ङलं रक्खन्तु सब्बदेवता,
सब्ब बुद्धानुभावेन सदा सात्थि भवन्तु ते||१३||
भवतु सब्ब मंग्ङलं रक्खन्तु सब्बदेवता,
सब्ब धम्मानुभावेन सदा सात्थि भवन्तु ते||१४||
भवतु सब्ब मंग्ङलं रक्खन्तु सब्बदेवता,
सब्ब संघानुभावेन सदा सात्थि भवन्तु ते||१५||
नक्खत्तवक्ख भूतानं पापग्गह निवारणा,
परित्तस्सानुभावेन, हन्तुते सब्बेे उपद्दवे||१६||
यदुन्निमितं अवमग्ङलंञ्च,
यो चोमनापो सकुणस्स सदो,
पापग्गहो दुस्सपितं अकन्तं|
बुद्धानुभावेन विनासमेन्तु||१७||
यदुन्निमितं अवमग्ङलंञ्च,
यो चोमनापो सकुणस्स सदो,
पापग्गहो दुस्सपितं अकन्तं|
धम्मानुभावेन विनासमेन्तु||१८||
यदुन्निमितं अवमग्ङलंञ्च,
यो चोमनापो सकुणस्स सदो,
पापग्गहो दुस्सपितं अकन्तं|
संघानुभावेन विनासमेन्तु||१९||

मराठी अर्थ 



महाकारुणीक भगवान बुद्धाने समस्त प्राण्यांच्या कल्याणाकरिता सर्व पारमिता पूर्ण करुन, उत्तम ज्ञान संपादन केले, ह्या सत्य वचनानो तुमचे मंगल होवो.||१||
बोधीवृक्षाखाली बसून ज्याप्रमाणे शाक्यसिंह बुद्धाने ज्याप्रमाणे जय मिळवला, त्याप्रमाणे तुमचा जय होवो, तुमचे मंगल होवो.||२||
जे बुद्ध रत्न उत्तम व श्रेष्ठ औषध आहे आणि जे सज्जन माणसांकरित हितकारी आहे, अशा बुद्ध रत्नाचा सत्कार केल्यामुळे बुद्धांच्या प्रतापाने सर्व उपद्रव नष्ट होवो आणि तुमचे सर्व दुःख दूर होवोत.||३||
जे धम्म रतन उत्तम व श्रेष्ठ औषध आहे आणि पिडेला शांत करणारे आहे, अशा धम्म रत्नाचा सत्कार केल्यामुळे बुद्धांच्या प्रतापाने सर्व उपद्रव नष्ट होवो आणि तुमचे सर्व भय शांत होवोत.||४||
जे संघ रतन उत्तम व श्रेष्ठ औषध आहे आणि जे आमंत्रणाला, पाहुणचाराला पात्र आहे, अशा संघ रत्नाचा सत्कार केल्यामुळे बुद्धांच्या प्रतापाने सर्व उपद्रव नष्ट होवो आणि तुमचे सर्व रोग शांत होवोत.||५||
या जगात जी काही विभिन्न रत्ने विद्यमान आहेत, त्यामध्ये बुद्ध रत्नासारखे श्रेष्ठ रत्न नाही, ह्यामुळे बुद्ध रत्नाच्या प्रतापाने तुमचे कल्याण होवो.||६||
या जगात जी काही विभिन्न रत्ने विद्यमान आहेत, त्यामध्ये धम्म रत्नासारखे श्रेष्ठ रत्न नाही, ह्यामुळे धम्म रत्नाच्या प्रतापाने तुमचे कल्याण होवो.||७||
या जगात जी काही विभिन्न रत्ने विद्यमान आहेत, त्यामध्ये संघ रत्नासारखे श्रेष्ठ रत्न नाही, ह्यामुळे संघ रत्नाच्या प्रतापाने तुमचे कल्याण होवो.||८||
भगवान बुद्धाशिवाय अनुसरण्यास सर्वोत्तम कोणी नाही, म्हणून मी भगवान बुद्धाला अनुसरतो ह्या सत्य वचनाने तुमचे कल्याण होवो.||९||
धम्माशिवाय अनुसरण्यास दुसरे काही नाही, म्हणून मी भगवान धम्माला अनुसरतो ह्या सत्य वचनाने तुमचे कल्याण होवो.||१०||संघाशिवाय अनुसरण्यास तिसरे काही नाही, म्हणून मी भगवान संघालाला अनुसरतो ह्या सत्य वचनाने तुमचे कल्याण होवो.||११||
सर्व संकट दूर होवोत, सर्व रोग नष्ट होवोत, तुमचे सर्व विघ्न नष्ट होवोत, तुम्ही सुखी आणि दीर्घायु होवोत.||१२||
तुमचे सर्व मंगल होवोत, सर्व सत्पुरुष तुमचे रक्षण करोत, बुद्धांच्या प्रतापाने तुमचे कल्याण होवो.||१३||
तुमचे सर्व मंगल होवोत, सर्व सत्पुरुष तुमचे रक्षण करोत, धम्माच्या प्रतापाने तुमचे कल्याण होवो.||१४||
तुमचे सर्व मंगल होवोत, सर्व सत्पुरुष तुमचे रक्षण करोत, संघाच्या प्रतापाने तुमचे कल्याण होवो.||१५||
सर्व वाईट प्रवृत्ती, दोष आणि सर्व उपद्रव परित्राण पाठ श्रवण केल्याने नष्ट होवोत.||१६||
जे वाईट निमित्त आहेत, वाईट कारण आहेत, अप्रिय शब्द आहेत व वाईट दोष आहेत, ते सर्व बुद्धांच्या प्रतापाने नष्ट होवोत.||१७||
जे वाईट निमित्त आहेत, वाईट कारण आहेत, अप्रिय शब्द आहेत व वाईट दोष आहेत, ते सर्व धम्माच्या प्रतापाने नष्ट होवोत.||१८||
जे वाईट निमित्त आहेत, वाईट कारण आहेत, अप्रिय शब्द आहेत व वाईट दोष आहेत, ते सर्व संघाच्या प्रतापाने नष्ट होवोत.||१९||

Comments

Popular posts from this blog

Trisaran-Panchshil and it's Marathi meaning | त्रिसरण पंचशील व मराठी अर्थ

Jaymangal And It's Marathi meaning | जयमंङ्गल अठ्ठगाथा व मराठी अर्थ

Bhim Stuti | भीम स्तुती व मराठी अर्थ