Karaniymetta Sutta and it's Marathi meaning | करणीयमेत्त सुत्त व अर्थ
करणीयमेत्त सुत्त
करणीयमत्थकुसलेन,यन्तं सन्तं पदं अभिसमेच्च|
सक्को उजू च सूज च,
सूवाचो चस्स मृदू अनातिमानी||१||
सन्तुस्सको च सुभारो च,
अप्प किच्चो च सलूहुकवुत्ति|
सन्तिन्द्रियोच निपको च,
अप्पगब्धो कुलेंसु अननुगिद्धो||२||
न च खुद्दं समाचेर किंच्चि,
येन विञु पर उपदेय्युु|
सुखिनो वा खेमिनो होन्तु|
सब्बे सत्ता भवन्तु सुखितत्ता||३||
ये केचिपाणभूत तिथ तसा वा,
थावरा वा अनवसेसा|
दिघावा ये महन्ता वा,
मज्झिमा रस्सका अणुकथूला||४||
दिठ्ठा वा येव अदिठ्ठा,
ये च दूरे वसन्ति अविदूरे|
भूता वा सम्भवेसी वा,
सब्बे सत्ता भवन्तु सुखितत्ता||५||
न परो परं निकुंब्बेथ|
नतिमञ्ञेथ कत्थाचि न किञ्जी|
व्यारोसना पटीघसंय्या,
नाञ्ञमेञ्ञस्स दुक्खमिंच्छेय्य||६||
माता यथा नियं पूत्तं,
आयुसा एकपुत्त मनुरक्खे|
एवम्पि सब्ब भूतेसु,
मानसं भावये अपरिमाणं||७||
मेतञ्च सब लेकस्मि,
मानसं भावये अपरिणामं|
उद्धं अधो च तिरीयञ्च,
असम्बाधं अवेर असपत्तं||८||
तिठ्ठ चरे निसिन्नो वा,
सयानो वा यावतस्स विगतमिद्धो|
एतं सतिं अधिठ्ठेय्य,
ब्रम्हेमे तं विहारं इधमा हु||९||
दिठ्ठिञ्च अनुपगम्भा,
सीलनवा दस्सनेन सम्पन्नो|
कामेसु विनेय्य गेधं,
न हि जातु गब्बभसेय्य पुनरेता तिं||१०||
मराठी अर्थ
शांती पदाची प्राप्ती इच्छिणार्या कल्याणसाधननिपुण मनुष्याने हि इच्छा करावी का त्याने योग्य सरळ व अत्यंत सभ्य बनावे,
त्याची वाणी मधुर असावी व तो कोमल आणि निराभिमानी असावा.||१||
तो संतुष्ट असावा, प्रामाणिक उपायांनी जीवन जगणारा असावा, तो उलाढाली करणारा नसावा व तो समाधानी, शांत-इंद्रिय, प्रज्ञावान, गंभीर व कुटुंबात अनासक्त असावा.||२||
त्याचे हातून क्षुल्लकांत क्षुल्लक देखील असे कृत्य न घडो, ज्या करिता सुज्ञ लोक त्याला दोष लावतील.सर्व प्राणी सुखी, क्षमावान, आनंदी राहोत ही भावना त्याने नेहमी बाळगावी.||३||
भूचर अथवा जलचर, छोटे अथवा मोठे, मध्यम अथवा लहान, सूक्ष्म अथवा स्थूल, दृश्य अथवा अदृश्य, दूरस्थ अथवा जवळ, उत्पन्न झालेले अथवा उत्पन्न होणारे असे सर्व प्राणी सुखाने राहोत.||४-५||
कोणीही दुसर्याला फसवू नये, कोणीही दुसर्याचा अपमान करु नये, शत्रुत्वाच्या अथवा विरोधाच्या भावनेने कोणीही अशी इच्छा न बाळगो ज्याने इतर दुःखी होतील.||६||
आपल्या प्राणाची पर्वा न करता, जसे आई आपल्या एकुलत्या एक मुलाचे रक्षण करते, त्याचप्रमाणे शांती पदाची इच्छा करणार्या माणसाने प्राणीमात्रांबद्दल निस्सीम प्रेमभावा वाढवावा.||७||
वर खाली आणि मध्ये राहणार्या सर्व लोकांनी8 प्राणीमात्रांबद्दल वैररहित व शत्रुत्व रहित मैत्री भावना बाळगावी.||८||
उभे असता, चालले असता, बसले असता, झोपले असता, जोपर्यंत जागे आहेत तोपर्यंत, ही मैत्री भावना कायम ठेवावी, यालाच ब्रम्हविहार असे म्हणतात.||९||
असा शीलवान व सम्यक दृष्टीसंपन्न मनुष्य कोणत्याही मोह जाळ्यात न पडता, काम तृष्णेचा नाश करुन, दुःखातून मुक्त होतो.||१०||
Comments
Post a Comment