Buddha Puja and it's Marathi meaning | बुद्ध पूजा व अर्थ
बुद्ध पूजा
वण्ण - गन्ध - गुणोपेतं एतं कुसुमसन्तति|
पूजयामि मुनिन्दस्स, सिरिपादसरोरूहे||१||
पुजेमि बुद्धं कुसुमेन नेनं पुञ्ञेन मेत्तेन लभामि मोक्खं|
पुप्फं मिलायति यथा इदं मे, कायो तथा याति विनास भावं||२||
पूजयामि मुनिन्दस्स, सिरिपादसरोरूहे||१||
पुजेमि बुद्धं कुसुमेन नेनं पुञ्ञेन मेत्तेन लभामि मोक्खं|
पुप्फं मिलायति यथा इदं मे, कायो तथा याति विनास भावं||२||
घनसारप्पदितेन दिपेन तमधंसिना|
तिलोककदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदं||३||
सुगन्धिकाय वदनं, अनन्त गुणगन्धिना|
सुगंधिनाहं गन्धेन, पूजयामि तथागतं||४||
बुद्धं धम्मं च संघं, सुगततनुभवा धातवो धातुगब्भे|
लंकाय जम्बुदीपे तिदसपुरवरे, नागलोके च थूपे||५||
सब्बे बुद्धस्स बिम्बे सकलदसदिसे केसलोमादिधातु वन्दे|
सब्बेपि बुद्धं दसबलतनुजनं बोधिचेत्तियं नमामि||६||
वन्दामि चेत्तियं सब्बं सब्बट्ठाने सुपतिठ्ठितं|
सारीरिक-धातु महाबोधि, बुद्धरुपं सकलं सदा||७||

मराठी अर्थ
मी वर्ण सुगंध आणि सुंदर गुणांनी युक्त अशा फुलांनी भगवान बुद्धांच्या चरण कमलांची पूजा करतो/करते.||१||
ह्या फुलांनी मी भगवान बुद्धांना पुजतो/पूजिते ह्या पुण्याने मला निर्वाण प्राप्त होवो. हे फुल जसे कोमेजते तसे माझे शरीर विनाशाकडे जाईल.||२||
अज्ञातरुपी अधःकाराचा नाश करणाऱ्याआ त्रिलोक्य दीप बुद्धांची मी लख्ख प्रकाश देणार्या दिव्याने पूजा करतो/करते.||३||
अनेक प्रकारची सुगंधी द्रव्ये मिसळलेल्या गंधाने ज्यांचे शरीर सुगंधी,अशा तथागत बुद्धांची मी पूजा करतो/करते.||४||
बुद्ध धम्म व संघ ह्यांना तसेच लंका, जंबूद्विप, नागलोक ह्यामधील स्तूपांतून भगवान बुद्धाच्या शरीरातील जितके अवयव स्थापित आहेत त्या सर्वांना मी वंदन करतो/करते.||५||
सर्व दाही दिशांतून बुद्धांची जेवढी प्रतिक आहेत, तसेच दहा बलाने परिपूर्ण अशा बुद्धांच्या केश वैगरे अवशेष स्थापिलेले आहेत, त्या सर्वांना मी वंदन करतो/करते.||६||
सर्व ठिकाठी स्थापिलेल्या चैत्यांना, बुद्ध शरीरच्या अवशेषांना व प्रज्ञा प्राप्त केलेल्या बुद्धरुपांना मी वंदन करतो/करते. ती सर्व बुद्धांचीच प्रतिक आहेत.||७||
Comments
Post a Comment