22 Pratidnya, Pledge (२२ प्रतिज्ञा)

                         
22 Pratidnya ( Dr.Babasaheb Ambedkar)
      

                  २२ प्रतिज्ञा

१. मी ब्रम्हा, विष्णु महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
२. मी राम, कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
३. मी गौरी, गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देव देवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
४. देवाने अवतार घेतले, यावर माझा विश्वास नाही.
५. बुद्ध हा विष्णूचा अवतार होय; हा खोटा आणि खोडसाळ प्रचार होय, असे मी मानतो/मानते.
६. मी श्राद्धपक्ष करणार नाही, पिंडदान करणार नाही.
७. मी बौद्ध धम्माच्या विरुद्ध- विसंगत कोणतेही आचरण करणार नाही.
८. मी कोणतेही क्रियाकर्म ब्राम्हणाच्या हातून करवून घेणार नाही.
९. सर्व मनुष्यमात्र समान आहेत असे मी मानतो/ मानते.
१०. मी समता स्थापण्याचा प्रयत्न करीन.
११. मी भगवान बुद्धाने सांगितलेल्या अश्ट्टांग मार्गाचा अवलंब करीन.
१२. मी भगवंताने सांगितलेल्या दहा पारमिता पाळीन.
१३. मी सर्व प्राणीमात्रावर दया करीन व त्यांचे लालन पालन करीन.
१४. मी चोरी करणार नाही.
१५. मी व्यभिचार करणार नाही.
१६. मी खोटे बोलणार नाही.
१७. मी दारू पिणार नाही.
१८. प्रज्ञा शील आणि करुणा या बुद्ध  धम्माच्या तीन तत्वांची सांगड घालून मजे जीवन चालविन.
१९. मी माझ्या जुन्या मनुष्य मात्राला असमान व निच मानणाऱ्या हिंदू धर्माचा त्याग करतो/ करते व बौद्ध धम्माचा स्वीकार करतो/ करते.
२०. तोच सद्धम्म आहे, अशी माझी खात्री पटलेली आहे.
२१. माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो/ मानते.
२२. मी इत:पर बुद्धाच्या शिकवणी प्रमाणे वागेन अशी प्रतिज्ञा करतो/ करते.

Comments

Popular posts from this blog

Trisaran-Panchshil and it's Marathi meaning | त्रिसरण पंचशील व मराठी अर्थ

Jaymangal And It's Marathi meaning | जयमंङ्गल अठ्ठगाथा व मराठी अर्थ

Bhim Stuti | भीम स्तुती व मराठी अर्थ